लहू चव्हाण
पाचगणी : पुस्तकांचे गाव भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या हिलरेंज माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व संस्थेच्या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन २६ जानेवारीऐवजी २७ जानेवारी रोजी आयोजित केले आहे. हा बदल लक्षात घेऊन या मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे व सचिव जतीन भिलारे यांनी केले आहे.
कै. एम. आर. भिलारे आणि स्व. बाळासाहेब भिलारे (दादा) यांनी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या हिलरेंज हायस्कूल (इंग्रजी माध्यम), हिलरेंज माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) आणि कै. एम. आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी या शाखा आहेत. सध्या हिलरेंज एज्युकेशन सोसायटीची धुरा (स्व.) बाळासाहेब भिलारे यांचे चिरंजीव नितीन भिलारे (अध्यक्ष), दुसरे चिरंजीव जतीन भिलारे (सचिव) आणि स्नुषा तेजस्विनी जतीन भिलारे व तेजस्विनी नितीन भिलारे समर्थपणे सांभाळत आहेत.
हिलरेंज माध्यमिक, हिलरेंज हायस्कूल, कै. एम. आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी या शाळांमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिकले आहेत. त्यापैकी अनेकांनी विविध ठिकाणी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन २६ जानेवारी ऐवजी २७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. तसेच २७ जानेवारीला सायंकाळी होणारा गायन कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे.
तर २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिलरेंज माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता हिलरेंज हायस्कूल येथे मेळावा होणार आहे. दुपारी ३ ते ७ हिलरेंज हायस्कूल, हिलरेंज माध्यमिक विद्यालय व कै. एम.आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांनी अजून लिंकवर रजिस्ट्रेशन केले नाही, त्यांनी रजिस्ट्रेशन करावे. (यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांनी पुन्हा करू नये.) जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी २७ जानेवारीच्या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व कै. एम. आर. भिलारे हायस्कूल, राजपुरी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे यांनी केले आहे
रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://forms.gle/gkWh9VgbgSjdcBiS या लिंकचा वापर करा. हिलरेंज माजी विद्यार्थी संघ, या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी https://chat.whatsapp.com/GF61 mLnitCV3XCPUJZSULU या लिंकवर क्लिक करा.