पंढरपूर: सोशल मीडियाच्या झगमगाटात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका रिलस्टार महिलेची तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील 34 वर्षीय सोनाली नेताजी जाधव हिची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केली.

सोनालीचे लग्न 16 वर्षांपूर्वी झाले होते, मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे ती आपल्या पतीपासून वेगळी माहेरी राहत होती. याच काळात तिचे गावातीलच तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, सोनाली दुसऱ्या एका मित्राच्या संपर्कात असल्याचे तुकारामच्या निदर्शनास आले आणि तुकारामला प्रचंड राग आला. त्याने सोनालीला वाढदिवसाच्या दिवशी 6 एप्रिल रोजी ‘वाढदिवसाचे गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेले आणि निर्जन स्थळी तिचा गळा दाबून खून केला.
वाढदिवसाला घराबाहेर पडलेली मुलगी दोन दिवस घरी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, रोपळे परिसरातील एका कालव्यात पोलिसांना एक कुजलेला मृतदेह सापडला. दरम्यान, तुकारामने गुन्हा कबूल केला असून त्याला अटक केली आहे.







