Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; चालक फरार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 April 2026, 11:56

हडपसर, ता. 17: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरात गुरुवारी (ता. 16) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निष्काळजीपणे वाहन चालवत अपघात घडवून आणल्यानंतर चालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रतिक अश्विन शेठ (वय 43, रा. रास्तापेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर उमेश आनंदराव जाधव व टँकर चालक अविनाश आनंदराव जाधव (वय 33 रा. शेवाळेवाडी ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक शेठ हे त्यांच्य दुचाकीवरून पुण्याकडून उरुळी कांचनच्या दिशेने जात होते. रविदर्शन बस स्टॉपजवळ पोहोचताच, मागून आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या एमएच 12 एचडी 3276 क्रमांकाच्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत प्रतिक शेठ रस्त्यावर पडले. मात्र, त्यानंतरही टँकर चालकाने वाहन थांबविण्याऐवजी अधिक वेगाने पुढे नेले. परिणामी, टँकरचे पुढील चाक थेट प्रतिक यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी टँकर थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालक अविनाश जाधव हा लोकांची नजर चुकवून पळून गेला.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, टँकरवर आवश्यक सुरक्षा सुविधा तसेच क्लिनर नसताना वाहन रस्त्यावर आणण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे अपघातास जबाबदार टँकर मालक उमेश जाधव यांच्याविरोधातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फिर्यादी नितीन बंबोली यांच्या तक्रारीवरून टँकर चालक व मालकाविरोधात महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे कलम 134, 184 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 3(5) व 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post
Fursungi

Fursungi : फुरसुंगीमध्ये आईला वाचवायला गेलेल्या मुलाच्या डोक्यात वडिलांनी घातला लोखंडी तवा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.