Madhukar Pichad Brain Stroke : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मधुकर पिचड यांना अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर आता नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना अर्धांगवायू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंब रुग्णालयात दाखल झाले आहेत.