सोलापूर : दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही असे, बावनकुळे म्हणाले आहेत.
भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिली नाही. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्य पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असं म्हणणार नाही. परंतु मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार असे, बावनकुळे म्हणाले आहेत.
‘दिल्लतून सोलापूरच्या खासदारकीचा उमेदवार ठरवण्यात येईल. राज्य ठरवत नाही अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे एकत्र बसून कोणला कोणती जागा द्यायची हे ठरवतील आणि मग केंद्रीय बोर्ड ठरवेल.’असे जागावाटपाविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.