लहू चव्हाण
पांचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अभय डोईफोडे यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल उद्योजक डोईफोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पुस्तकांचं गाव भिलार येथील लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या बैठकीत हा युवा विभागातील पुरस्कार समितीने जाहीर केला.
अभय डोईफोडे हे बोंडारवाडी गावचे रहिवासी असून हॉटेल व्यावसायिक आहेत. हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी पर्यटकांना चांगल्या सुविधां देण्याचे व्रत स्वीकारले आहे. याबरोबरच उद्योग सांभाळत सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. अल्पावधीत सामजिक सेवेचा आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपूरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत.
त्यांच्या कामाची दखल घेऊन अभय डोईफोडे यांची या पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजपूरे, उपाध्यक्ष प्रवीण या कामाची दखल घेऊन अभय डोईफोडे यांची या पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजपूरे, उपाध्यक्ष प्रवीण भिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवा उद्योजक अभय डोईफोडे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे उद्योग, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.