सातारा: आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी तसेच वेळ पडल्यास अधिकाऱ्यांना सुद्धा फैलावर घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसिद्ध आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये आली आहे. रविवारी सातारमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाहाला उपस्थिती लावल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाने अधिकाऱ्याची पाचावर धारण बसली.
शासकीय विश्रामगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार विकासकामांचा आढावा घेत होते. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने अजित पवारा यांच्याकडे शासकीय विश्रामगृहात पिण्यासाठी पाणी देत नसल्याची तक्रार केली. या गोष्टीवर संतापलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्याला फैलावर चांगलाच दम भरला. संबंधित कर्मचारी परत या ठिकाणी दिसला, तर तुम्ही दिसणार नाही, असा सज्जड दम दिला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली.
दरम्यान संबंधित कार्यकर्त्याने त्या कर्मचाऱ्याकडे पाणी मागितल्यानंतर त्याने पाण्याची साधी बाटली देऊ केली. यानंतर कार्यकर्त्याने बिसलेरीची मागणी केल्यानंतर वाद झाल्याने तो कार्यकर्ता थेट अजित पवारांनी मी याठिकाणी आल्यानंतर सर्व बिले चुकते करतो, असे सांगत कार्यकर्त्यांना पाणी न दिल्याने नाराजी व्यक्त केली.