श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभेचे आयोजन केले होते. आज बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गावचे सरपंच कोमलताई भाऊसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते फळे, भाजीपाला, तरकारीसह, मिठाई दुकाने, किराणा दुकाने, हॉटेल आदी व्यवसायाबाबत बाजार भरवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येळपणे हे जिल्हा परिषद गटाचे प्रमुख गाव आहे. यापूर्वी गावात दर बुधवारचा आठवडे बाजार भरत होता. परंतु काही कारणामुळे बाजार बंद झाल्याने बाजारासाठी ग्रामस्थांना लोणी व्यंकनाथ, चिंभळे, बेलवंडी, भाजीपाला विक्री आणि घेण्यासाठी या ठिकाणी जावे लागत असे, यामुळे ग्रामस्थांनसह महिलांनी गावचे सरपंच सौ. कोमलताई भाऊसाहेब पवार, उपसरपंच, संभाजी धावडे, यांच्याकडे आठवडे बाजार भरण्याबाबत मागणी केली होती. गावची लोकसंख्या व गरज लक्ष्यात घेऊन ४ सप्टेंबर २०२४ पासून (पंधरा दिवसांनी) दर बुधवारी येळपणे गावात मारुती मंदिर शेजारी पटांगणात आठवडे बाजार भरणार असून याबाबत आज झालेल्या ग्रामसभेत सूचक ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब पवार व अनुमोदन युवा उद्योजक सतीश धावडे यांनी दिले. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सर्वांना अव्हान करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी तानाजी कुऱ्हाडे, सोसायटीचे चेअरमन नवनाथ देवकर, व्हाचेअरमन हरीकाका आहेर, ज्ञानेश्वर चौधरी, मा. चेअरमन पोपट ढुस, सतीश हुलसर, आण्णा कांबळे, देवराम कांबळे, बाळासाहेब आहेर, सुनील कोळपे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार, तसेच कृषी सहाय्यक प्रियंका घोडके, का. तलाठी शरद सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह बहुसंख्येने नागरिक महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
येळपणे गाव हे बागायती पट्ट्यातील असून येळपणे जिल्हा परिषद गट आहे. या गावामध्ये दोन सहकारी सेवा सोसायट्या आहेत. गावचे आर्थिक व्यवहार कोट्यावधी रुपयांचे आहेत मात्र सहकारी अगर राष्ट्रीयकृत कुठलीच बँकेची शाखा नसल्याने ग्रामस्थांना महिलांना बेलवंडी, हंगेवाडी, लोणी व्यंकनाथ या ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी जावे लागत असल्याने जावे लागत आहे. गावामध्ये कोणतीही बँक व्हावी अशी मागणी ग्रामसभेत केल्याने याबाबतही सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.