सांगली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात सांगलीमध्ये काँग्रेसकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगलीमध्ये महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोध मविआमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय प्रकरण..
इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. इस्लामपूरमध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसमधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आता याचप्रकारणी जयंत पाटील यांच्याविरोधात कारवाई कारण्यात यावी, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.