– प्रमोद बी आहेर
श्रीगोंदा (अहमदनगर) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. या दिरंगाई निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभु प्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर रक्ताचा अभिषेक घालण्यात आला.
यावेळी एका बाजुला छत्रपती संभाजी राजेंसमोर रक्ताचा अभिषेक घालत महसुल प्रशासनाचा निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला रक्तदान शिबीर घेऊन सामाजिक भान जपण्याचे काम संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले.
सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाकडून विलंब झाल्याचे यावेळी तहसीलदार यांनी मान्य करत यापुढे या विषयात जलद काम करत लवकरात लवकर अतिक्रमण काढणार असल्याचे सांगण्यात आले.
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे, नाना शिंदे, उपाध्यक्ष दिलीप लबडे, कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहराध्यक्ष विनोद मेहत्रे, बालु दादा मखरे, मंगेश मोटे, वैभव वनशीव, गणेश पारे, नाना आदी तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर रक्ताभिषेक केला. तर शेकडो तरुणांनी यावेळी रक्तदान करुन या आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज, जिल्हा कार्यध्यक्ष सुनिल ढवळे, कार्याध्यक्ष संदीप साळवे, उपाध्यक्ष राकेश नवले, सचिव सुहास गाडेकर, राजेंद्र राऊत, अजिज भाई शेखआदी प्रमुख पदाधिकारी तर राजकीय व काँग्रेस नेते घनशाम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाध्यक्षा मिराताई शिंदे, आर पी आय नेते राजाभाऊ जगताप, बाळासाहेब दतारे, मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे, मा. नगराध्यक्ष एम डी शिंदे, आदिक वांगणे, शिवसेना नेते संतोष खेतमाळीस, मुकुंद सोनटक्के, संतोष इथापे, दिपक मखरे, तुषार मोटे, अक्षय मखरे, केशव झेंडे, गोपाळराव मोटे , शांताराम पोटे, आसिफभाई इनामदार, हेमंत हिरडे, होरे माऊली, विकास होले, बाबू शेठ कोथंबीरे, अक्षय काळे आदिंसह मोठ्या संख्येने शंभू प्रेमी उपस्थित होते.