अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. काल ९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील वॉर रुममध्ये झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या गावांना दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ज्या गावांना दुष्काळी परिस्थितीत सर्व सवलती लागू झाल्या नाहीत त्या गावांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच अहवाल मागवून, याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या नेत्यांची उपस्थिती
मंत्रालयातील वॉर रुममध्ये झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे, कृषीमंत्री धनंजय मुडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी विभागाचे मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण उपस्थित होते.
५ लाख टन मुरघास निर्मिती
राज्यात पशुधनाच्या चाऱ्यासाठी १ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ५ लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार असून ३० कोटी रूपये खर्चालाही मान्यता या बैठकीत दिली आहे. पशुपालकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे, जिथे अद्याप पर्जन्यमापक बसविलेले नाहीत किंवा मात्र, बिघडलेली आहेत, अशा महसुली मंडळांचे अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे नुकताच 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी 75 पेक्षा कमी आणि ७५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेऊन, जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 96 मंडलाच्या गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ही आहेत ९६ महसुली मंडळे
नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजूर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सतलबपूर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रुक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, ब्राम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रुक, धांदरफळ बुद्रुक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिवळा, देवदैठण, कोळगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रुक, उंदिरगाव, टाकळीभान,