सातारा / लहू चव्हाण : नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी या शब्दातच तिचे सुंदर, सालंकृत, सुवर्णाचे दागिने घातलेले स्वरूप डोळ्यासमोर येते. भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव अंतर्बाह्य शुद्धी करणारा आणि शक्ती वाढवणारा उत्सव आहे.
शक्ती हा सर्वांच्याच श्रद्धेचा व आवडीचा विषय आहे. प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे. किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत. बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजेच सरस्वती देवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी देवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टीचे नामोहरम करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल.
आयुर्वेदात तर शक्तीला सर्वोत्तम स्थान दिलेले आहे. इंद्रिय, मन व आत्मा यांची प्रसन्नता हे आरोग्याचे लक्षण असते व शक्तीशिवाय आरोग्य नसते. शक्ती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. या शक्तीला पुन्हा चैतन्याचा स्पर्श व्हावा, तजेला यावा यासाठी भारतीय संस्कृतीने ‘नवरात्र’ उत्सवाची योजना केली आहे.
आजची स्त्री कुणाची तरी बायको, बहीण, आई तर आहेच पण आज ती शेतकरी, डॉक्टर, पोलिस, वकील, फोटोग्राफर किंवा उद्योग क्षेत्र अशा वेगवेगळ्या पदावर विराजमान आहेत, अशाप्रकारे देवीची ही नऊ रूपे
फोटोग्राफर – रवि पवार आणि त्याची टीम रुचिका खामकार. मेकअप आर्टिस्ट संध्या भोसले यांनी कॅमेऱ्याने टिपली आहेत.