पाचगणी,ता.९ : ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पाचगणी येथील हिलरेंज इंग्लिश मिडीयम स्कूल या इंगजी माध्यमाच्या शाळेने एज्युकेशन टुडेचा सन्मान पटकाविला आहे. या सन्मानामुळे हिलरेंज इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबई येथील हॉटेल ललित येथे झालेल्या कार्यक्रमात एज्युकेशन टुडेचे मॅनेजिंग डायरेक्ट अनिल शर्मा यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे व संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे यांनी स्वीकारला.
महाराष्ट्रातील केंद्रीय शिक्षा बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, आय. सी. एस सी बोर्ड अंतर्गत विविध गुणवत्ता धारक शाळांमधून हिलरेंज हायस्कुल या शाळेला पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे संस्थेचे सचिव जतिन भिलारे व संचालिका तेजस्विनी जतिन भिलारे यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन होत आहे.
दरम्यान, कै.बाळासाहेब भिलारे यांनी दूरदृष्टीने पाचगणी व परिसरात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा असूनही ग्रामीण भागात सुरू केलेल्या शाळेला पाचगणीतील शाळांमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळणे हे गौरवास्पद आहे. अशी प्रतिक्रिया पालकवर्गांतून व्यक्त होत आहे.