पुणे : राज्याच्या काही भागात पुढील काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनची महाराष्ट्राकडे दमदार वाटचाल सुरु आहे.
1 जून रोजी पुण्यात 38 अंश सेल्सिअस कमाल तर 25 किमान तापमान नोंदवलं गेलं. 2 जून रोजी कमाल तापमानाचा एका अंशाने घट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ हवामान असून विजांच्या कडकडाटासह हलका पाऊसही होऊ शकतो.
पालघर, ठाणे आणि मुंबईत आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून सायंकाळनंतर पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.