अजित जगताप
Waduj News : वडूज, (सातारा) : नैसर्गिक संकट हे आपण समजू शकतो परंतु, मानवी संकटामुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. विशेषता ग्रामीण भागात किरकोळ वादाने अनेकांचे स्वप्न भंग पावले आहे. मानसिक- आर्थिक- शारीरिक त्रास सहन करावा लागतो. परंतु खटावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांनी काही अर्जांचा संपूर्ण अभ्यास करून सम्यक मार्गाने रस्त्याचा प्रश्न सोडवला. (The road dispute was settled amicably with the efforts of Khatav Tehsildar)
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात विविध परवाने, दाखले तसेच महसुली विभागात अंतर्गत येणाऱ्या अनेक जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घ्यावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयामध्ये जमीन, जागेच्या प्रश्नाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. (Waduj News) अगदी मालकीची जागा असून ही वहिवाटीला देत नाहीत. अशा स्वरूपाच्या तक्रारीमुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागत होते. या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः जागेवर जाऊन काही प्रकरणाचा निपटारा करण्याचा सपाटा लावलेला आहे. आतापर्यंत साडेतीनशे किरकोळ रस्ते मोकळे करून दिले आहेत.
२७ शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मार्ग मोकळा
गुरुवारी (ता. २५) रोजी तहसील कार्यालयातील कामकाज उरकून जमदाडे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी दोन्ही भावकीचे लोकांना एकत्र बोलून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते. यामध्ये दुजाभाव करता येत नाही. (Waduj News) तत्पूर्वी आपण एकमेकांना समजून घेऊन सामंजसपणाने मार्ग काढल्यास आपल्या मनासारखा निर्णय लागेल. असा स्पष्ट आदेशवजा सूचना केली. त्यानंतर गोपुज गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवल्यानंतर गेले अनेक दिवसापासून दोनशे एकर क्षेत्रात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचा वाद मिटला. व २७ शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
कळंबी गावात दोन रस्त्याचे प्रश्न होते. या सरबांधावरील रस्त्याच्या अडचणीमुळे परीट वस्ती कडे जाणारा गट नंबर २२३ मधील अडथळा दूर करण्यास यश मिळाले आहे. (Waduj News) काही शासकीय अधिकारी म्हणजे कागदी घोडे नाचवतात परंतु जमदाडे यांनी प्रत्येक प्रकरण म्हणजे न्यायप्रविष्ठ बाब असू शकत नाही. याची जाणीव ठेवून मानवता भावनेतून काही अर्ज निपटारा करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
त्यामुळे आता वाद मिटवण्यासाठी तहसील कार्यालय तसेच सक्षम अधिकाऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे लागत आहे. ज्यांच्यामध्ये वाद आहेत ती मंडळी जर समंजस असतील व एकमेकांबद्दल आदरभाव व्यक्त करणारे असतील तर एका दिवसात एक प्रश्न सुटू शकतो. याची खात्री आता खटाव तालुक्याला पटलेली आहे. (Waduj News)
काही जण व्यक्तिगत स्वार्थासाठी असत्याचा आग्रह करून तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवत असतात. त्यांच्याकडे आपल्या मालकीचे कागदपत्रे नसतात. परंतु, आम्ही सांगतो तेच खरे असे मानणारे काहीजण अज्ञानापोटी आपल्यावर अन्याय झाला. पैसे घेवून निर्णय घेतला. (Waduj News) असे फक्त सांगतात. पण, कधी ही लेखी तक्रार दाखल करीत नाहीत. त्यांच्या कडे कागदपत्रं देण्याची मागणी करून ही ती दिली जात नाहीत. किंवा सखोल चौकशी केल्यानंतर त्यामध्येही तथ्य नसल्याचे आढळून आलेले आहे.
दरम्यान, शेवटी माणूस आहे हा चुका करू शकतो. तसेच दुरुस्त सुद्धा करून देतो. हे सुद्धा अनेकांना पटले आहे. दरम्यान ग्रामीण भागातील लोकांना रस्ता खुला करून देण्यापेक्षा त्यांच्या मनातील गैरसमज दूर केल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. (Waduj News) शेवटी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करावे लागते आणि त्यातून लोक सुद्धा चांगल्या भावनेतून जर सहकार्य करत असतील तर अनेक प्रश्न हे पोलीस ठाणे अथवा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर सुद्धा सोडवले जावू शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara Political News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याला झुकते माप मिळणार ??
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…