पुणे प्राईम न्यूज : ओमान (जॉर्डन) येथे शुक्रवार (दि.22) जून 2024 पासून कुमार आशियाई कुस्ती स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज फ्रीस्टाईल विभागातील 48 किलो वजनगटात महाराष्ट्राच्या विशाल शिळीमकर याने रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे. या अगोदर पै.ओंकार काटकरने 65 किलो वजनगटात रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच ग्रिकोरोमन विभागात पै.समर्थ म्हाकवे 55 किलो वजनगटात रौप्यपदक व पै.तुषार पाटील याने 60 किलो वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली होती.
या कुमार आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्राचे एकुण 5 कुस्तीगीर सहभागी झाले होते. पै.विशाल शिळीमकर, पै.ओंकार काटकर व पै. रोहन भंडागे हा लोणीकंद पुणे येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असून पै.संदीप भोंडवे यांनी सुरु केलेल्या मिशन ऑलिंपिक योजनेचे ते दत्तक कुस्तीगीर आहे. पै. समर्थ म्हाकवे हा साई स्पोर्ट होस्टेल, कांदीवली मुंबई येथे सराव करत असून पै.तुषार पाटील हा सेनादलाचा कुस्तीगीर आहे.
पदक विजेत्या कुस्तीगीरांचे केंद्रीय राजमंत्री व कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै.मुरलीधर मोहोळ, मा.खासदार व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, सरचिटणीस पै.योगेश दोडके, पै.विलास कथुरे यांनी अभिनंदन केले.