Wardha Crime News : वर्धा : वर्ध्यात महिलेकडून नरबळी देण्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने विहिरीला शेंदूर लावून बालकाला विहिरीत ढकलले होते. त्यानंतरतून महिलेने तेथून पळ काढला. मुलाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला. त्याने विहिरीतील दोरीचा आधार घेत आपला जीव वाचवला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मुलाचं नशीब बलवत्तर म्हणून वाचला
वर्ध्यातील नालवाडी परिसरात ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या महिलेने एका बारा वर्षीय बालकाला विहिरीत ढकलले. सुरूवातीला तिने बालकाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढला. नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला आहे.
नेमकं झालं काय होतं?
नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले होते. 12 वर्षांच्या मुलाला तिने विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला शारदा हिने लगेच विहिरीत ढकलले. त्यांतर तिने तेथून पळ काढला. मुलाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत विहिरीच्या वर आला आणि आपले प्राण वाचवले. घरी पोहचल्यानंतर बालकाने आई वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा वरके हिच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र सरकारने २०१३मध्ये “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम २०१३”, हा कायदा संमत केला. हा फौजदारी कायदा आहे. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा, असेही म्हटले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी १६ वर्षे संघर्ष केला.