नागपूर : विजयादशमी उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. बांगलादेश, पाकिस्तानच नाही तर जगभरातील हिंदूंच्या हक्क रक्षणासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. नागपूर येथे विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारचे कान टोचले आहेत. त्यांनी सरकार आणि हिंदूंना दुर्बलता हा अपराध असल्याचे थेट आवाहनच केले आहे. त्याचवेळी सरसंघचालकांनी प्रामुख्याने ओटीटीच्या माध्यमातून फोफावणाऱ्या अश्लिलतेवरही बोट ठेवले.
पाकिस्तान आपला मित्र आहे..
बांगलादेशात चर्चा सुरु आहे कि भारत आपला शत्रू आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. अशी चर्चा तिथे होत आहे. असे नॅरेशन होत आहे. बांगलादेशात जे घडलं तसं घडण्यासाठी भारतातही तसं होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संस्थांना ताब्यात घ्यायचं, विद्यापीठ, शिक्षण संस्था, माध्यम या द्वारे समाजात विचारांची विकृती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात सरसंघचालकांनी केला. आपणंच आपल्या लोकांना शिव्या देण्याचं वातावरण निर्माण केलं आहे. लोकांना उग्र करुन, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. यामुळे त्या देशावर बाहेरुन वर्चस्व करणं सोप होतं. कारण आता युद्ध करणं सोपं नाही, त्यामुळे हे केलं जात आहे. असे सरसंघचालक म्हणाले.
आता काही लपून राहत नाही..
मीडिया सर्वत्र पोहोचला आहे त्यामुळे आता काही लपून राहत नाही. घरा घरात मोबाईल पोहचला आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. जो नशा करत नाही. त्याला मागास समजलं जातंय. कोलकात्यामध्ये काय झालंय. तिथे डॅाक्टरांसोबत सर्व देश उभा राहीला. सर्वत्र असं होतंय. गुन्हे आणि राजकारणाचं मिलन झाल्याने असं होत असल्याचा आरोप सरसंघचालकांनी केला.
विषमता येवढी वाढली की..
विषमता येवढी वाढली की आपले संत आम्ही वाटले. वाल्मीकी जयंती फक्त वाल्मीकी समाजातंच का व्हावी? सर्व समाजानं करावं. समाजात काय धोके आहे. याची माहिती आपल्या समाजात देणं गरजेचं आहे. आपल्यात जी दुर्बल जाती आहे. त्यासाठी आपण काय करायचं, हे ठरवायला हवं. समाजातील वेगवेगळ्या जातीमधील लोक एकत्र बसून काम केलं. तर समाजात सद्भावना राहिल, असे ते म्हणाले. ओटीटीवर चालणाऱ्या अश्लाघ्य, अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज आहे. व्यवस्थित चालायचं असेल तर मिळून चालण्याच शास्र आहे. संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि अधिकार हा विचार समाजात पोहोचायला हवा. असही ते म्हणाले.