Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हेंटिलेटरचा स्फोट अन् नवजात कक्षात आगीचा भडका! 3 बाळांचा मृत्यू, 6 बाळांना वाचवण्यात यश

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 August 2026, 8:35

अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (SNCU) सोमवारी पहाटे अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. आगीच्या वेळी कक्षात 12 बाळांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 बाळांना डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढले. काही बाळांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. काही क्षणांतच आगीने गंभीर स्वरूप धारण केले आणि कक्षात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे बचावकार्य करताना कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.

या परिस्थितीत ड्युटीवर असलेल्या दोन परिचारिकांनी धाडस दाखवत बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कक्षातील बाळांना बाहेर काढले. बचावकार्यादरम्यान दोन्ही परिचारिकांच्या हातांना भाजल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर 3 नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाची क्षमता 13 बालकांची असून एकूण 39 बाळांवर उपचार करता येतात. यापैकी एका कक्षात ही आग लागली होती.

 

दरम्यान, आगीत कक्षातील एसीसह इतर उपकरणे आणि साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे, रुग्णालयाची नवीन इमारत अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झाली होती. त्यामुळे आग लागल्यानंतर अग्निरोधक यंत्रणा प्रभावीपणे का कार्यान्वित झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांमध्ये पूजा बोरगे यांचा मुलगा, गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा आणि किरण बेठेकर यांची मुलगी यांचा समावेश आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

खवड्या डोंगर दुर्घटनेला नवं वळण! आयफोन नव्हे, ‘हा’ कौटुंबिक वाद ठरला कारण? कुणालच्या आत्याने केला धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp