-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : वणी एरिया निलजई माईन्स येथील डब्ल्यु.सी.एल फायनान्स व्यवस्थापक माणीकलाल मदनमोहन पोल, लिपीक अविनाश मारोतराव काकडे यांनी 2000 रुपये लाच घेतल्या प्रकरणी केळापूर न्यायालयाचे न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 5 वर्षांची शिक्षा व 12,000 रुपये द्रव दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सिबीआय – एसीबीचे विशेष सरकारी वकील ॲड. अनुज शर्मा यांनी सरकारची बाजू मांडली.
वसीम खान यांचे वणी येथे वाहन दुरुस्तीचे दुकान आहे. त्यामुळे डब्ल्यु.सी.एल फायनान्स व्यवस्थापक माणीकलाल मदनमोहन पोल यांनी मेडीकलचे वाहन दुरुस्तीसाठी वसीम खान यांच्याकडे टाकले होते. त्याचे दुरुस्ती बिल अंदाजे 51,000 रुपये झाले होते. वाहन दुरुस्तीचे बिल काढून द्यावे, अशी विनंती वसीम खान यांनी मानीकलाल पोल यांना केला. मात्र, वाहन दुरुस्तीचे बिल काढायचे असल्यास 3/3 हजार रुपये द्यावे लागेल, असे पोल यांनी वसीम खान यांस सांगितले. वसीम खान यांनी सीबीआय नागपूर यांच्याकडे लाच मागितल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी मानीकलाल मदनमोहन पोल व अविनाश मारोतराव काकडे यांच्या विरुद्ध सापळा रचला व 2,000 रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7, 13 (2) सह कलम 13 (1) (d) (i) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास करुन केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणी आरोपी माणीकलाल मदनमोहन पोल यांस लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7, 13 (2) सह कलम 13 (1) (d) (i) अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा व 5000 रुपये द्रव दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. कलम 13 (2) सह कलम 13 (1) (d) (i) अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा व 7,000 रुपये द्रव दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी पाच महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. आरोपी अविनाश मारोतराव काकडे यांस लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा व ₹ 5,000 द्रव दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तर कलम 7 अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. 3,000 रुये द्रव दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. भादंवि कलम 120 (ब) मध्ये दोन्ही आरोपींची न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारतर्फे सीबीआय एसीबीने विशेष सरकारी वकील ॲड. अनुज शर्मा (नागपूर) यांनी काम पाहिले.