अकोला: महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही, याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर बुधवारी सकाळी निर्णय घेणार आहेत. वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक संपली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही, यावर चर्चा झाली.
या बैठकीनंतर वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वंचितची आज रात्री १० वाजता पुन्हा एक बैठक होणार आहे. ही अंतिम बैठक असून या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती मोकळे यांनी दिली.
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी सोबत आली नाही तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय देखील जागावाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित केला आहे.