यवतमाळ : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील सभेत भाषणादरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी हे भाषण करत असताना त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणारच तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना पकडले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. महायुतीच्या यवतमाळच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. यावेळी स्टेजवर असलेल्या उपस्थितांनी त्यांना पकडलं. आज शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदमधील शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करत असताना गडकरींना भोवळ आली. यानंतर नितीन गडकरींना उपचारासाठी रुग्णलयात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
पुसद, महाराष्ट्र में रैली के दौरान गर्मी की वजह से असहज महसूस किया। लेकिन अब पूरी तरह से स्वस्थ हूँ और अगली सभा में सम्मिलित होने के लिए वरूड के लिए निकल रहा हूँ। आपके स्नेह और शुभकामनाओं के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) April 24, 2024