Satara News : मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी कबुली राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतःच दिली आहे. शनिवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची साताऱ्यामध्ये मोठी सभा झाली. या सभेनंतर जरांगेनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन राजगादीस अभिवादन केले.
त्या ठिकाणी उदयनराजेही उपस्थित होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, जालना येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्ही पाडू, असे वक्तव्य केले होते, याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अशी मिश्कीलपणे प्रतिक्रिया देत विरोधकांची चांगलीच खिल्ली उडवली.(Manoj Jarange Patil)
साताऱ्यात शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर जरांगेनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन राजगादीस अभिवादन केले. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. उदयनराजे यांनीही त्यांना आंदोलन करताना काळजी घ्या, तुम्हाला कुटुंब आहे. त्यांना तुमची खूप गरज आहे. असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी जरांगे पाटलांना दिला.(Maratha resarction)
यावेळी उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत जातिनिहाय जनगणना करण्याची मागणीही केली. तसेच मराठा समाजाने मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहनही केले.(Satara Lok sabha)
जालना येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात ओबीसी समाज 150 मराठा आमदारांना पाडतील, असा इशारा देण्यात आला होता. त्या वक्तव्याबाबत उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आलं असता. त्यावर उदयनराजे म्हणाले, पाडा..पाडा.. मी म्हणतो. अजून काय बोलू. मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही. पाडायचं काय बोलायचं? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी त्या विधानाची खिल्ली उडवली. मात्र त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यावेळी उदयनराजे भोसले लोकसभेसाठी सातारा जिल्ह्यातून निवडणूक लढवणार की नाही याबाबत चांगला संभ्रम निर्माण झाला आहे. (Udaynraje Bhosale)