चंद्रपूर : जनकापूर शिवारात आठवडाभरात वाघाने दोन बैलांवर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी देवा तलांडे यांचे मोठे नुकसान झाल्याने वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जनकापूर शिवारात दहा दिवसांपूर्वी संततधार पाऊस झाला. देवा तलांडे यांनी शेतीची कामे झाल्यानंतर आपल्याच शिवारात बैलांना चरण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वाघाने एका बैलाला रविवारी तर गुरुवारी दुसऱ्या बैलास ठार केले. वनविभागाने दोन्ही मृत बैलांचा पंचनामा केला. शेतीच्या हंगामात य दोन्ही बैल ठार झाल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.