दरम्यान, शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी होत असलेला विलंब आणि अल्प प्रमाणात रक्कम जमा होत असल्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र, कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने अखेर आक्रमक शिवसैनिकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून संताप व्यक्त केला.
उबाठा शिवसेना गटाने आक्रमक होत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीने आक्रमक होत जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांची खुर्ची उलटी करत निषेध आंदोलन करण्यात आले. तर तात्काळ यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी उबाठा शिवसेना गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, माजी आमदार संतोष टारफे, गोपू पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.