वाशिम: वाशिम जिल्ह्यातील हराळ या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी दिलेल्या नोटीसाची होळी करण्यात आली आहे. देशातील मोठ्या उद्योगपतींचे कर्ज जसे सरकारने माफ केले, तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करत सातबारा कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरले नाही, अशा शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांनी कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत.