यवतमाळ : यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड फेकण्यात आला आहे. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फुटली आहे. ही घटना यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचारसभेवेळी घडली.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच यवतमाळमध्येही महायुतीची प्रचार सभा पार पडणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंतही यवतमाळमध्ये आले आहेत.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी जात असताना वाटेत अज्ञात व्यक्तीने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फुटली आहे. या दगडफेकीमध्ये कुणीही जखमी झालेलं नसून.दगडफेक नेमकी कुणी केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.