घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथे एसटी बस आणि मेटॅडोरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आकपूरी बसस्थानकाजवळ 2 ऑक्टोबर रोजी दुपारी सडे वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी मेटॅडोर चालक निलेश देवसिंग चव्हाण (रा. कुर्ली, ता. घाटंजी) यांनी वडगांव जंगल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 ए, 324 (4) (5) अंतर्गत वडगांव जंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, आकपूरी बसस्थानकाजवळ 2 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास किनवट आगाराची एसटी बस क्र. एमएच – 20 बीएल- 1650 यवतमाळ वरुन किनवटकडे जात होती. आकपूरी नजीक आले असता मेटॅडोरला जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक प्रवासी जखमी झाले होते. काही रुग्णांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना उपचारानंतर यवतमाळच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी वडगांव जंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.