अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले तीन दिवस सोयाबीनची मोठी आवक झाल्याने शेतमाल ठेवण्यासाठी यार्डमध्ये जागा नसल्याने लिलावासाठी आलेला शेतमाल पडून राहत आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस शेतकऱ्यांनी बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणले तरी आवक स्वीकारली जाणार नाही, याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. बाजार समितीला सहकार्य करावे व आप गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ४९ हजार ९६ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे दिवसभर लिलाव, चाळणी, माप तोल सुरू होते. कमाल भाव ४ हजार ४५० रुपये, किमान दर ४ हजार रु तर सर्वसाधारण भाव ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनचे दर घसरले आहेत.
ओलाव्याचे कारण देत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. रब्बी पेरणीसाठी पैशाची जुळवा-जुळव आणि सणासुदीमुळे नाईलाजास्तव सोयाबीनची शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. मात्र सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याचे कारण सांगून व्यापारी सोयाबीनला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर देत आहेत