यवतमाळ : यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. राज्यात सर्वत्र दिवाळी उत्सव साजरा केला जात असून या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे. मात्र, फटाके फोडण्यावरून झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतला आहे. हा वाद टोकाला जाऊन यामध्ये तरुणाच्या पोटात शस्त्राने वर करून हत्या केल्याची घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली आहे. विशाल लोखंडे (वय २३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, घटना यवतमाळच्या पुसदमधील वसंतनगर येथे घडली आहे. फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन तरुणात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की यात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही कळण्याच्या आत तरुणाच्या पोटात चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फटाके फोडण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये विशाल लोखंडे (वय २३) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. आदित्य आठवले (वय २१) असे संशयित रोपीचे नाव आहे. दरम्यान आदित्य आठवले याला पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य आठवले हा पूसद शहरातील संभाजीनगर येथील रहिवाशी आहे.