अमरावती : नवनीत राणा आणि रवी राणा यांचा बालिशपणा सुरु आहे. त्या फार बालिशपणे वागतात. यापूर्वी त्यांनी बरेचसे कार्यकर्ते घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले पण ते तोंडघशी पडले. अमरावतीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार उभा राहणार असून नवनीत राणा यांना तिकीट मिळणार नाही. त्या फारच करतात खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला.