अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत शिवसेना -उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली. महाविकास आघाडीतून अमरावती लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुखांसह इतरही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अमरावती लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांNewची वाशिम येथे पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती.