अकोला : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या दरम्यान नेते मांडली एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. अशातच आता संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी अकोला येथे बोलत होते.
आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा होता. त्यामुळे अजित पवारांसंदर्भात त्यांची भूमिका काय असणार? याकडे महाराष्ट्राच लक्ष असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर आता मिटकरींनी जोरदार पलटवार केला आहे.
‘लाडका जिल्हा’ नाही का..?
पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय? असा प्रश्न यावेळी आमदार मिटकरी यांनी केला आहे. दरम्याण, पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा, असं संजय राऊत यांना कधीच वाटू शकणार नाही. असंही मिटकरी म्हटले आहेत. अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी परत एकदा जोरदार टीका केली आहे.
उद्या विखे पाटील स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाला अकोल्यात येणार नाहीये. विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा ‘लाडका जिल्हा’ नाही का?, अकोला जिल्हा विखे पाटलांसाठी ‘सावत्र जिल्हा’ झालाय का? असे प्रश्न आमदार मिटकरींनी विखे पाटीलांना विचारले आहेत. टीका करणाऱ्यांना दुसरा उद्योग नाहीये, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक वर्ष काढले. अनेक नेते त्यांच्यामुळे पक्ष सोडून गेलेत. मनसेसारखा पक्ष विभक्त झाला, याला कारणीभूत फक्त राऊत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.