Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, फुग्यांनी सजवलेली खोली, अन् रक्तरंजित थरार! तरुण-तरुणीने हॉटेल रूम बुक केली; किंचाळण्याचा आवाज आला आणि..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 16:40

नागपूर: नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या रक्तरंजित घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या सजवलेल्या खोलीत २८ वर्षीय तरुणीचा चाकूने वार करून खून करण्यात आला, तर तिच्यासोबत असलेल्या तरुणाने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनीषनगरमधील अजित बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये मंगळवारी शिवानी राजानंद गजभिये (वय २८, रा. अजनी) आणि किरण संजय आत्राम (रा. अजनी) यांनी रूम क्रमांक ३०२ घेतली होती. दोघेही भारतीय रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक या खोलीतून तरुणीच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज हॉटेल कर्मचाऱ्यांना ऐकू आला.

आवाज ऐकताच कर्मचाऱ्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर शिवानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर किरणही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेतील आणखी एक बाब पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ज्या खोलीत हा प्रकार घडला, ती खोली गुलाबाच्या पाकळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आली होती. शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र होते. तसेच किरणने स्वतःवर वार केल्यानंतर तिच्या भांगेत कुंकवाऐवजी रक्ताचा टिळा लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे. हा वाद मिटवण्यासाठी किंवा एकत्र वेळ घालवण्यासाठी दोघे हॉटेलमध्ये आले असावेत, असा प्राथमिक संशय आहे. मात्र, खोलीत वाद विकोपाला गेल्यानंतर किरणने चाकूने शिवानीवर हल्ला केल्याची शक्यता तपासली जात आहे.

हा हल्ला पूर्वनियोजित होता का, चाकू आधीच सोबत आणण्यात आला होता का आणि हॉटेलची सजावट नेमकी कोणी केली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29
Next Post

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आता तरी जागा द्या ; उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा सवाल ; प्रशासन सहकार्याला तयार, मग देवस्थान ट्रस्टची दिरंगाई कशासाठी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp