अकोला: बदललेल्या वातावरणामुळे गोवरच्या साथीने देशाच्या काही भागात डोकेवर काढले आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात साथ नसली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या निदेर्शानुसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिप्ता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.
गोवर हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जो मॉबीली व्हायरस नावाच्या विषाणूमुळे पसरतो. हा संसर्ग मुख्यतः मुले आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पुढील उपाय योजना कराव्यात. तसेच लसीकरण या आजाराला रोखु शकते. त्यामुळे आपल्या लहानग्यांकडे बारीक लक्ष देवून लसीकर करुन घेणे हे महत्वाचे आहे.