नागपुर : नागपुर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे (मुळ गावं मु. पो. कोंढेज ता करमाळा जि सोलापूर) यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे चार वाजता जगातील आठव्या उंच ठिकाणी माउंट मनासलू येथे भारताचा तिरंगा तसेच महाराष्ट्र पोलीसचा झेंडा रोऊन नागपुर पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एवरेस्ट वीर (पाहिले s IPS सुहेल शर्मा, दुसरे पो हवा. रफिक शेख(छत्रपती संभाजीनगर), तिसरे सपोनी. संभाजी गुरव (पुणे शहर)असून नागपुर पोलीस पोलीसचे पहिले मनासलू वीर आहेत शिवाजी ननवरे ठरले आहते.
ननवरे म्हणाले की, माऊंट मनासलु शिखराची चढाई अत्यंत खडतर आहे. बर्फाचा भाग जास्त आहे. त्यामूळे 7 हजार मीटर त्रास होतो. भारतातून शिवाजी ननवरे हे यशस्वी ठरले असून हार मानेल तो माणूस कसला? आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी ननवरे यांनी मंगळवारी दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी माऊंट मनासलू शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकविला. शिवाजी ननवरे यांना 2018 साली पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 2019 सालीकेंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित तसेच खडतर सेवा पदकाने सन्मानित केले आहे. तसेच त्यांना The Alpinist चे एवरेस्ट वीर भगवान चवले व एवरेस्ट वीर API संभाजी गुरव यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगीतले.
याबाबत बोलताना शिवाजी ननवरे यांनी सांगितले की माऊंट मनासलू सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता देखील असणे आवश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात.
माऊंट मनासलू हे जगातील आठ नंबरचे उंच शिखर आहे. हिमालय पर्वतातील हे शिखर 8163 मीटर उंचीचे असून नेपाळ चीन सीमेवर स्थित आहे. या वर्षी सतत बदलत्या हवामानामुळे मला हे शिखर सर करण्यासाठी 20 दिवस लागले. महाराष्ट्र पोलीसमधून यापूर्वी कोणीही हे शिखर सर केले नसल्याने तसेच महाराष्ट्र पोलीसमध्ये व संपूर्ण भारतातुन आठ हजार मीटर उंचीचे तीन शिखर कोण्याही पोलिसांनी सर केले नाहीत.
त्यामुळे महारष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशभरात आणखी उंचावली आहे. कारण देशातून पोलिसांनी हे शिखर पहिल्यांदा सर झाले आहे. यासाठी मला नागपुर पोलीस कमिशनर रवींद्रकुमार सिंगल सर, सह आउक्त अस्वती दोर्जे मॅडम, DCP राहुल माखनिकर सर, DCP HQ पाटील मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. यामुळेच मी माऊंट मनासलु टॉपवरती पोहचू शकलो. असे शिवाजी ननवरे यांनी सांगितले आहे.