दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत राजस्थानच्या दोन तर, महाराष्ट्राच्या एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानमधील जयपूरमधून पक्षाने आपला उमेदवार बदलला आहे. येथून सुनील शर्मा यांच्या जागी प्रतापसिंह खचरियावास यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील दौसा मतदारसंघातून मुरारी लाल मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरणार आहे.
काँग्रेस पक्षाकडून आत्तापर्यंत 187 उमेदवारांची नावे जाहीर
काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत 187 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, याआधी शनिवारी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ४५ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. काँग्रेसने राजस्थानमधील नागौर जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षासाठी (आरएलपी) सोडली होती. यापूर्वी 21 मार्च रोजी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती, त्या यादीत 57 नावांचा समावेश होता. काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस उमेदवारांची पाचवी यादी
- महाराष्ट्र – चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर
- राजस्थान – जयपूर – प्रताप सिंह खाचरियावास
- राजस्थान – दौसा – मुरारी लाल मीना
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ ने लोकसभा चुनाव, 2024 के लिए कांग्रेस उम्मीदवारों के नाम की पांचवीं लिस्ट जारी की। pic.twitter.com/ypskx4hoDi
— Congress (@INCIndia) March 24, 2024