अमरावती : आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. अशातच आता प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये चागंला उमेदवार मिळाला, अशी भूमिका बच्चू कडू यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झाला आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडून नवनीत राणा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही या मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये आणखी पेच वाढण्याची शक्यता आहे.
आमच्याकडे अतिशय ताकदीचा उमेदवार
आमची मैत्रिपूर्ण लढत असेल. आम्हाला अतिशय ताकदीचा उमेदवार मिळाला आहे. तो उमेदवार एक लाखांच्या वर मतांनी निवडून येणार आहे. उमेदवार कोण तो 6 एप्रिला आम्ही जाहीर करू. आमच्या कार्यकर्त्यांची काही नाराजी आहे, मतदारसंघात ताकद असूनही विचारले जात नाही. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.