वाशिम : वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांच्या मागील अडचणीत थांबता थांबेना. त्यांचे एकेक कारनामे उघड होत आहे. खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या चौकशीसाठी पुणे पोलीस गेले असता त्या भेटल्या नाहीत. त्यामुळे त्या फरार झाल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांची 3 तास चौकशी केली आहे.
या चौकशीवेळी वाशिम जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आराज यांच्यासह दोन अधिकारी होते. त्यांनी बंद खोलीत पूजा खेडकर यांची चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे पूजा खेडकर यांची नेमकी काय चौकशी झाली हे मात्र ज्ञात समजू शकले नाही.
पूजा खेडकर काय म्हणाल्या..
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्हाधिकारी परवानगी घेऊन वादग्रस्त पूजा खेडकर यांनी स्वतःच काही विषय मांडायचे म्हणून संबंधित पोलीस अधिकारी यांना बोलून घेतले. मात्र, त्यावेळी काय चौकशी झाली, हे मात्र समोर अद्याप आले नाही. दरम्यान माध्यमांशी बोलताना वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी माझ्यावर खूप आरोप होत आहे. जे काही आरोप होत आहे, त्याचे उत्तर मी कमिटीला देईल. माझे म्हणणे समितीपुढे मांडणार आहे, असे त्या म्हटले आहे.
11 वेळा परीक्षा…
यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकर यांनी अकरा वेळा स्वतःचे नाव बदलले आहे. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारास सहा संधी असतात. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारास नऊ संधी असतात. परंतु पूजा खेडकर यांनी 11 वेळा परीक्षा दिल्याचे वृत्त सद्या व्हायरल होत आहे. परंतु त्याला अजून तरी दुजोरा मिळाला नाही. 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख करण्यात आला. असे एकूण 11 वेळा पूजा खेडकर यांनी आपल्या नावात बदल केला होता.