वर्धा : वर्ध्यात स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये ग्रामीण शैलीत शिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेले नितेश कराळे गुरुजी यांनी राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अर्ज मागविले असताना कराळे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा दर्शविली. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याने कराळे गुरूजींनी शरद पवार यांची भेट घेत आपली उमेदवारी कशी सक्षम आहे, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.