घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील निमगुडा वार्ड क्रं. 2 मध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. यापुर्वी वार्ड क्रं. 2 बेघर वस्ती वरिल नागरिकांनी कुर्ली ग्रामपंचायत वर मोर्चा नेला होता. सदर मोर्चात सैय्यद सोहेल, गिरजाबाई, पुष्पा अंगावार, सिमा गोस्कुलवार, चिनक्का गोस्कुलवार, रत्नमाला शंकर बेलदार, लक्ष्मी मंत्रीवार, सलमा गालीब, रुबीना पठाण या सह शेकडो महिला-पुरुषांनी मोर्चा नेला होता. या वेळी सरपंच सतिश गड्डमवार, उपसरपंच फुलचंद जाधव यांनी गावकऱ्यांना पाणी पुरवठा लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
मात्र, सैय्यद मुस्ताक (सैय्यद तौसिफ) यांच्या शेतातून फक्त दोन दिवस पाणी सोडण्यात आले. परंतु, शेतीला पाणी द्यावयाचे असल्याने दोन दिवसानंतर तेथील पाणी बंद करण्यात आले. वास्तविक पाहता, गजानन सुंकटवार यांनी दान दिलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तेथील विहिरीला संपूर्ण गावात पिण्याचे पाणी पुरेल एवढा साठा आहे. मात्र, कुर्ली ग्रामपंचायतने तेथून कुर्ली गावात नळ योजना सुरू केली नाही. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अघव हे अनेकदा कुर्ली गावात नळ योजना सुरू करण्यासाठी आले असता, त्यांना गावातून परतावून लावले.
निमगुडा वार्ड क्रं. 2 मधील नागरिकांना रस्त्याने चालने झाले कठीण
तर दुसरीकडे कुर्ली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते अशोक रेड्डीवार यांच्या घरापर्यंत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून निमगुडा वार्ड क्रं. 2 मधील नागरिकांना रस्त्याने चालने कठीण झाले आहे. वास्तविक पाहता, सदर रस्त्याने बेघर वस्तीतून शेतकऱ्यांना शेतात ये – जा करण्यासाठीचा रस्ता आहे. परंतु, सदर रस्त्यावर पाणी साचलेले असल्याने निमगुडा वार्ड क्रं. 2 मध्ये रस्त्यावर चालने अतिशय कठीण झाले आहे.
या बाबत निमगुडा वार्ड क्रं. 2 मधील नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी सुभाष मानकर यांचे कडे लेखी तक्रारीतून केली आहे. कुर्ली येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई व रस्त्यांची कामे तातडीने करण्यात यावे, अन्यथा 30 सप्टेंबर 2024 पासून कुर्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सैय्यद सोहेल सैय्यद गालीब व इतरांनी प्रशासनाला दिला आहे.