Nagpur Crime : नागपूर : दिवसाढवळ्या दुहेरी हत्याकांडमुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि त्याच्या मित्राची हत्या पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात करण्यात आली. या प्रकरणी किरण शेंडेसह यातील सर्व संशयित आरोपींना वाठोडा पोलिसांनी अटक केली आहे.
आर्थिक वादातून हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री उशीरा वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत साईबाबानगरात ही घटना घडली. सनी शिरूडकर (33 जलालपुरा, गांधीबाग) आणि कृष्णकांत ऊर्फ कुन्नु भट (24) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. तर किरण शेंडे (24) त्याचा भाऊ शेंडे (20) विक्की कोहळे (20) आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सनीने किरण शेंडेलाला त्याच्या व्यावसायासाठी इएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती. मात्र, किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्याने, सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले. त्यामुळे खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. किरणने पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्यांच्यात अधिक वाद वाढून दोघांमध्ये मारहाण झाली. दरम्यान त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेंट्रिंगच्या राफ्टरने सननी आणि कुन्नुवर हल्ला केला. दगडाने त्यांचे डोके ठेचून त्यांना गंभीर जखमी केले. यात कुन्नुचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
काही तासात अटक
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली. दरम्यान सनीने किरण शेंडेला बाईक मिळवून दिली होती. त्याशिवाय काही उसने पैसेही दिले होते. कालांतराने किरणने ईएमआय भरणे अपेक्षित होते. मात्र त्याने वेळेवर पैसे न भरल्याने किरणने त्यांची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.