नागपूर : शहरात एक मोठी धक्कादायक घडली आहे. फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातावेळेस झालेल्या मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री 12 वाजता वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एका भरधाव इरटीका कार चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना चिरडले आहे. या घटनेतील धक्कदायक बाब म्हणजे आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या गडबडीत कारला मागेपुढे केल्याने या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक आहे. जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे.