अमरावती: आमदार बच्चू कडू यांची भारतीय जनता पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. कडू यांनी जागावाटपावरुन ही नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला एकदा दिल्लीत बोलवले , त्यानंतर चर्चा करायला बोलावले नाही. भाजपला आमची गरज नसेल, मात्र आम्ही पण जागा लढवू. तसेच जिथे वाटेल तिथे निवडणूक लढवू, असं कडू यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांना आमचा पक्ष छोटा वाटत असेल. महायुतीच बंधन आमच्यावर नाही. मी अमरावतीच्या सर्व लोकांना आवाहन करतो की, शांतता महत्त्वाची आहे. मी कोणाच्या बाजूने बोलतोय अस न होता शांतता महत्त्वाची आहे, असंही कडू म्हणाले.