अमरावाती : अमरावातीमधून एक भीषण अपघाताची बातमी सामोर्येत आहे. १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, क्रिकेट मॅच खेळण्यासाठी यवतमाळ येथील १४ तरुण मिनी बसमध्ये अमरावतीहून सकाळी निघाले होते. मिनी बस यवतमाळच्या दिशेने जात होती. वाटेतच नांदगाव -खंडेश्वरजवळ शिंंगणापूर जवळ हा अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण गंभीर जमखी झाले आहे. मिनी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत बसचा मागील भाग आणि ट्रकचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी अपघातातील जखमी तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटल मध्ये आता या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर वाहतुकांची कोंडी झाली होती.