Pune Prime news : बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोणार तालुक्यातील हत्ता गावात तुरीच्या पिकात चारशेहून अधिक गांजाची झाडं लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतात गांजाची झाडं असल्याची माहिती बुलडाणा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हत्ता गावात अनिल धुमा चव्हाण यांच्या शेतात तुरीच्या पिकामध्ये चारशेहून अधिक गांजाची लागवड केली होती. या घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचे पथक शेतात दाखल झाले असून कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.