Manoj Jarange : जालना : सध्या मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात विस्तवही जात नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ओबीसी मेळाव्यात आमची लायकी काय आहे हे सांगताना भुजबळ यांनी भीमा कोरेगावच्या लढाईसहीत अनेक उदाहरणे देत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेत भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सर्व समाजाचं कल्याण व्हावं असं आमचं सर्वांचं मत आहे. भुजबळांनी मराठ्यांचं वाटोळं केलं आहे. त्यांना तेढ निर्माण करायची आहे. मात्र, समाजाने शांत राहावं. मी संभाजी राजेंना सांगू शकतं नाही. इतका मी त्या गादीचा सन्मान करतो. ओबीसी नेत्यांना तेढ निर्माण करायची आहे. त्यांची इच्छा पूर्ण होऊ देऊ नका. राजे आमच्या पाठिशी आहेत. भीमकोरेगावच्या संदर्भाने त्यांनी जातीवाचक उद्गार काढले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल केला पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
भुजबळांकडूनच हातपाय तोडायची भाषा
ओबीसी बांधव सोबत असताना भुजबळ हातपाय तोडायची भाषा करतात. जुनाट नेत्यांचा विचार चांगला नाही. अशी भाषा असताना सरकार झोपलंय का? त्यांना आवरा अन्यथा आम्ही सभेत समाचार घेऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आरक्षण आणि उद्योगांचा काय संबंध
आमची परिस्थिती अशी की आम्ही हुशार असून आम्हाला काम करता येत नाही. आम्हाला झेंडे उचलायला लागत आहेत. यामुळे आंबेडकरांनी दिलेला सल्ला आम्ही मनाला आहे. आमचे सुशिक्षित बेकार झाले आहेत. त्यांच्या हाताखाली काम करत आहे. त्याचा अर्थ समाजाकडे असा नाही. मी सगळ्या जातीसाठी काम करतो. 24 तारखेपर्यंत थांबा आम्ही सगळं सांगणार आहोत. तोवर थांबा. मराठ्यांनी आरक्षण मागितलं म्हणून उद्योग येणार नाहीत का? या अगोदर का आणले नाही? राजकीय नेते खूप हुशार असतात. आम्ही शांततेत आरक्षण मागितलं तर उद्योग येणार नाहीत असं सांगितलं जात आहे, अशी टीका त्यांनी केली.