नागपूर : भाजपाच्या एकाच जागेवर मित्रपक्ष लढणार आहेत ते म्हणजे बारामती. बाकी जागा आमच्या सिटिंग आहेत, त्यामुळे तसा प्रश्नच येत नाही. उर्वरित ज्या जागा आहेत, त्या जागांवर शिंदे आणि अजित पवार लढतील. जागा या सन्मानपूर्वक असतील. कोणीही दुखावणार नाही या पद्धतीचे महायुतीचे समीकरण असेल. चांगल्या पद्धतीने महायुतीचे समीकरण तयार करून येणाऱ्या लोकसभेत मोदींच्या नेतृत्वात 45 प्लस जागा आत्मविश्वासाने आम्ही जिंकू असे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.