गणेश सुळ:
पालघर: राज्यातील अनेक शैक्षणिक प्रश्न प्रलंबित असून यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यासंदर्भात श्री. स.तु.कदम कला व वाणिज्य महाविद्यालय पालघर येथे राज्याचे अध्यक्ष जी.के. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत ते बोलत होते.
शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले जाणार असून या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले जाणार आहे. तसेच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भाची निवेदने राज्य शासनास दिली जाणार आहेत. या अधिवेशनाचे निमंत्रण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांनाही देण्यात आले आहे.
आजच्या या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, स्थळ, प्रमुख पाहुणे, प्रमुख शिक्षणतज्ञ यांच्या उपस्थितीबाबत तसेच टीडीएफच्या वतीने सेवाजेष्ठ शिक्षकांना राज्यस्तरीय जीवनगौरव तसेच संघटनेसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये मागील बैठकीचे इतिवृत्त राज्याचे कार्यवाह के.एस. ढोमसे सर यांनी वाचले हे इतिवृत्त सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष नरसू पाटील यांनी एक दिवशीय अधिवेशन आयोजित करून प्रलंबित शैक्षणिक प्रश्न शासन दरबारी मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जी. के. थोरात सर यांनी आगामी काळामध्ये अधिवेशनाचे आयोजन करून विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नाबाबत तज्ज्ञांची चर्चा घडवून आणून शासन दरबारी या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. तसेच संघटनेसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल असे मत व्यक्त केले.
यावेळी राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष नरसू पाटील, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पवार, मुंबई विभाग अध्यक्ष नानासाहेब फुंदे, राज्य खजिनदार निशांत रंधे, कोकण अध्यक्ष सागर पाटील, पालघर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष गणेश प्रधान, कार्याध्यक्ष फावडे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, राज्य प्रतिनिधी प्रदीप गाढवे, पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफचे अध्यक्ष प्रा.शशिकांत शिंदे तसेच यावेळी डॉ.ए.डी. नांद्रे, सहसचिव रोहित जाधव, ज्योती नेटवटे, मंगला जाधव, मायकल राज्य टीडीएफचे इतर पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.