नागपूर : आजपासून जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत आहे. एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी 19 टक्के जागांवर मतदान होत आहे. 1 जूनपर्यंत 44 दिवसांचा लोकशाही प्रवास सुरू राहणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभेच्या 92 जागांसाठीही मतदान होत आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत किती झाले मतदान?
भंडारा गोंदिया : 19.72 %
चंद्रपूर : 18.94 %
गडचिरोली-चिमुर : 24.88 %
नागपूर : 17.53 %
रामटेक :16.14 %